पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हैसूरमध्ये 'प्रोजेक्ट टायगर' (Project Tiger)ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मेगा कार्यक्रमात वाघांच्या गणनेची ताजी आकडेवारी जाहीर करतील. ते बांदीपूर (Bandipur) आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या (Mudumalai Tiger Reserves) वाटेवर आहे.पीएम मोदी आज काळी टोपी, खाकी पँट, टी-शर्ट आणि काळे शूज घातलेले दिसले. त्यांच्या एका हातावर स्लीव्हलेस जॅकेट देखील दिसून आले. "हैदराबाद आणि चेन्नईमधील कार्यक्रमांनंतर मी म्हैसूरला आलो आहे. उद्या, 9 एप्रिल रोजी मी प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे," असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पहा ट्विट-
PM @narendramodi is on the way to the Bandipur and Mudumalai Tiger Reserves. pic.twitter.com/tpPYgnoahl
— PMO India (@PMOIndia) April 9, 2023
ಹೈದರಾಬಾದ್ ಮತ್ತು ಚೆನ್ನೈನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನಂತರ ಮೈಸೂರಿಗೆ ಬಂದಿರುವೆ. ನಾಳೆ ಏಪ್ರಿಲ್ ೯, ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಟೈಗರ್ ನ ೫೦ ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವೆ. https://t.co/0r5JZM6ewy
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2023
पंतप्रधान मोदी 'अमृत काल' दरम्यान वाघांच्या संवर्धनासाठी सरकारचे व्हिजन देखील जाहीर करतील आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स (IBCA) लाँच करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल रोजी म्हैसूर येथे प्रोजेक्ट टायगरच्या 50 वर्षांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर म्हैसूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने 6 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात येण्यास बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 181 वरील वाहनांची वाहतूकही बंद केली असून व्हीव्हीआयपींच्या भेटीमुळे या रस्त्यावरून जाणारी वाहने इतर मार्गाने वळवण्यात आली आहेत.
पंतप्रधान रविवारी सकाळी 7.15 वाजता बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देतील आणि सकाळी 11 वाजता व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर करतील.