Dhiraj Sahu IT Raids

काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू (MP Dheeraj Sahu) यांच्याशी संबंधित बौध डिस्टिलरीज प्रा. लि या मद्य कंपनीच्या ओडिशातील कार्यालयांवर गेल्या आठवड्यात छापे घातले होते. तेथून जप्त केलेल्या रोख रकमेची मोजदाद रविवारी  पूर्ण झाली असून तिचे मूल्य 353 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रक्कम मोजण्यासाठी 50 यंत्रे व स्टेट बँकेच्या 50 अधिकाऱ्यांनी सलग पाच दिवस काम केले.  जप्त केलेल्या चलनी नोटांच्या मोजणीला पाच दिवस लागले. रविवारी ही मोजणी पूर्ण झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) बालंगीर, संबळपूर आणि तितलागड या तीन शाखांमध्ये जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी नेली होती. (हेही वाचा - Dhiraj Sahu IT Raids: ओडिशातील काँग्रेस नेत्याच्या घरातून 351 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त झाल्यानंतर हवाला ऑपरेटर, शेल कंपन्यांची भूमिका तपासली जाणार)

ओडिशात भाजपने राज्यात अवैध मद्याचा व्यापार आणि काळ्या पैशाचा प्रसार केल्याचा आरोप राज्य सरकारवर केला. या कथित काळ्या पैशाच्या व्यवहाराविरोधात ओडिशातील सर्व उपविभागांसमोर भाजपने निदर्शने केली.  भाजपने सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) पक्ष आणि त्यांच्या सरकारवर  टिका केली.

ओडिशा सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणामुळेच राज्यात मद्य माफियांची संख्या वाढली आहे. सरकार मद्य सम्राटांना अवाजवी लाभ देत आहे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या काळ्या पैशाने ‘बीजेडी’ निवडणूक लढवत आहे,’ असा आरोप ओडिशातील भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनमोहन समल यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे.