पाकिस्तानच्या 'हनी ट्रॅपिंग'मध्ये अडकले 50 भारतीय जवान
Imaged used for Representational Purpose | (Photo Credits: PTI)

आयएसआयच्या महिला एजंट अनिका चोप्रा (Anika Chopra) या नावाने असलेल्या बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून भारतीय जवानांना जाळ्यात ओढलं आहे. अनिका चोप्रा या भारतीय सैन्यात नर्स असल्याचं सांगितलं जातंय. यांच्या फेक फेसबुक अकाऊंटवर हिरव्या रंगाच्या साडीत, गोड हास्यात त्यांचा फोटो पाहायला मिळतो. ही महिला जवानांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील नृत्य करुन दाखवत असे. राजस्थानच्या जैसलमेरमधून सोनबीर सिंग या जवानाच्या अटकेनंतर अजून 50 भारतीय जवान 'हॅनी ट्रपिंग'च्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी संघटनांचे नवे हत्यार; तरुणांना दहशतवादाकडे आकर्षिक करण्यासाठी 'हनी ट्रॅपिंग' सुरु

सोनबीर सिंग हा जवान गेल्या काही काळापासून फेसबुकच्या माध्यमातून अनिका चोप्रा यांच्याशी संपर्कात होता. सोनबीर सिंगच्या यांच्या अटकेनंतर त्या अकाऊंटची चौकशी करण्यात आली आणि त्या 50 अधिक जवान अनिका चोप्रा यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

अनिका चोप्रा यांच्या नावे सुरु असलेलं बनावट फेसबुक अकाऊंट हे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयएस चं असून ते पाकिस्तानातून चालवलं जात आहे. या अकाऊंटवर अनिका चोप्रा या एमएनएस म्हणजे मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये नर्स असल्याचे नमूद केले आहे. तर गुजरात जुनागड असे लोकेशन त्यात आहे. यामुळे सोमबीर या फेक अकाऊंटच्या जाळ्यात अडकला आणि त्याने सैन्यासंबंधित संवेदनशील माहिती, फोटो, व्हिडिओ अशी माहिती या अकाऊंटद्वारे थेट पाकिस्तनाला पुरवली. सोमबीरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या अटकेत आहे.