दुबईतील पहिल्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलसचा 57 धावांनी पराभव करत इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

दिल्लीतील वायू प्रदूषण गेल्या वर्षी डिसेंबरपासून सर्वात वाईट पातळीवर गेला आहे. सीपीसीबी टास्क फोर्सने सरकारच्या, खाजगी कार्यालये आणि इतर आस्थापनांना वाहनांचा वापर 30 टक्क्यांनी कमी करण्याचे सुचवले आहे.

तमिळनाडू सरकारने भाजपच्या 'वेल यात्रे'ला परवानगी नाकारली आहे. भगवान मुरुगाच्या सहा निवासस्थानावर ही रॅली उद्यापासून काढण्यात येणार होती.

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 841 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण रुग्णसंख्या 2,61,684 वर पोहोचली आहे. आज शहरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 10,374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रवासी रहदारी वाढल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना विमानसेवा करण्यास परवानगी असलेल्या देशांतर्गत उड्डाणांची संख्या 70-75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या वृत्तवाहिन्यांचे मालक असलेल्या ARG Outlier Media Limited ने दाखल केलेल्या नव्या अर्जावर मुंबई हायकोर्टाने सीबीआयला नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोन विषाणूच्या 5,246 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णसंख्या आता 17,03,444 वर पोहोचली आहे. आज राज्यात 117 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या 44,804 वर पोहोचली आहे.

हरियाणा विधानसभेत राज्यातील लोकांना खाजगी नोकरीत 75% आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली असून, जिल्ह्यात 21 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक मतदानकेंद्र हे तहसील कार्यालयातच उभारण्यात येणार आहे.

कर्नाटक: 2016 मधील धारवाडचे भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून खटल्यात सीबीआयने कॉंग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना अटक केली.

Load More

अमेरिकेमध्ये यंदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये ऐतिहासिक मतदान झाले आहे. दरम्यान आज सलग दुसर्‍या दिवशी देखील मतामोजणी सुरू आहे. जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्यामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. त्यामुळे व्हाईड हाऊसच्या शर्यतीमध्ये कोण पुढे जाणार याबद्दल आता उत्सुकता वाढत चालली आहे. दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांच्याकडे आघाडी असल्याने रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करत यंदाच्या निवडणूकीत घोळ झाल्याचा दावा करत विरोधकांनी ही निवडणूक चोरण्याचा आरोप काल केला होता.

दरम्यान मुंबई सह महाराष्ट्रामध्ये आता नव्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आज मुंबईसह महाराष्ट्रात थिएटर्स, नाट्यगृहं 50% क्षमतेने पुन्हा उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कलाविश्वाचं अडकलेलं अर्थविश्व आता पुन्हा मार्गावर येण्यास हळूहळू सुरूवात होत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

काल‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णब यांच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे जेल की बेल चा निर्णय आज होईल.