Live
मुंबईत DRI अधिका-यांनी 3 कोटी रुपयांचे हेरॉईन केले जप्त, तपास सुरु ; 4 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Dec 04, 2020 10:56 PM IST
विधानपरिषदेच्या 6 जागांवर 1 डिसेंबर दिवशी निवडणूक झाल्यानंतर आता त्याचे निकाल स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून सुरू झालेली मत मोजणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी मतमोजणीचं काम सुरू होते. दरम्यान निकालांचा कल पाहता भाजपाला हादरा बसण्याची शक्यता आहे. 4 ठिकाणी महाविकास आघाडी आणि एका जागेवर अपक्ष तर धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागी भाजपाला विजय मिळाला आहे.
भारतामध्ये कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी मागील 8 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यावरून आता शेतकरी- सरकार मध्ये बोलणी सुरू झाली आहे. शिवसेनेने यावर सामना मधून टीका केली आहेत. हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं असं म्हणत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने काल घेतली आहे. मात्र, कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान ममता बॅनर्जी, अकाली दलाचे नेते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत असे सांगितले आहे. तसेच काल जर केंद्राने कृषी कायदा रद्द केला नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.