पैशांचा पाऊस पाडुन पैसे डबल करून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना कासा पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अशाप्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे पोलीस अधीक्षक पालघर यांचे जनतेला आवाहन.

मुंबई इंडियन्स संघाचा सनराईज हैदराबाद विरोधात खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात पराभव झाला आहे.

गाझियाबाद येथे झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली असून घटनास्थळी 15 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

ओडिशा सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, रूग्णांच्या आरोग्याची परिस्थिती लक्षात घेता वायू प्रदूषण रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात राज्यभर फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली आहे.

ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चटर्जी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

02059/02060 कोटा-हजरत निजामुद्दीन-कोटा विशेष ट्रेन ही उद्याच्या गुर्जर आंदोलनामुळे रद्द झाली आहे. उत्तर रेल्वेने याबाबत माहिती दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबरपासून कोरोना व्हायरस सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करून 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत.

राज्य आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 4,909 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 6,973 रुग्ण बरे झाले असून 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे राज्यातील रुग्णसंख्या 16,92,693 झाली असून, आतापर्यंत 15,31,277 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,16,543 सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे आणखी 746 रुग्ण आढळले असून 15 जणांचा बळी गेला आहे.

US Presidential Elections 2020 साठी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंम्प यांनी फ्लोरिडा मध्ये केले मतदान केले आहे.

Load More

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) च्या दुस-या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदार सोशल डिस्टंसिंगच्या (Social Distancing) नियमांचे पालन करुन काटेकोर पद्धतीने हे मतदान केले जात आहे. दरम्यान आज 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होत आहे. यात टप्प्यात एकूण 1463 उमेदवारांचे भविष्य आजच्या मतदानावर अवलंबून असणार आहे. यात 1316 पुरुष तर 146 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तसेच एक तृतीयपंथीयाचा पण समावेश आहे. दुस-या टप्प्यात 2 कोटी 85 लाखांहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी मतदान केंद्रांवर योग्य ती काळजी आणि सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

तर दुसरीकडे गुजरात राज्य विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी सुरेंद्र नगर येथे मतदारांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान नवी दिल्लीतील वायूप्रदूषण दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात आहे.