दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट राईडर्सवर 18 धावांनी विजय; 3 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Oct 03, 2020 11:44 PM IST
कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) सुरक्षिततेच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अनेक उद्घाटन, बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या. मात्र आज नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) रोहतंग (Rohtang) येथे अटल बोगद्याचे अनावरण करणार आहेत. त्यासाठी ते विमानाने चंडीगड़मध्ये (Chandigarh) दाखल झाले आहे. आज सकाळी 10 वाजता रोहतंग हा उद्घाटनचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणाऱ्या रोहतंग बोगद्याला 'अटल बोगदा' नाव देण्यात आलंय. 10 हजार फूट उंचीवर स्थित हा जगातील सर्वात लांब बोगदा असून हा तयार करण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला.
तर दुसरीकडे भारताभोवती कोरोना व्हायरसचा विळखा देखील घट्ट होत चालला आहे. मात्र यात दिलासादायक गोष्ट म्हणजे मागील आठवड्याभरात 25 राज्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात देखील काल 15,591 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 13,294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे एकूण 11,17,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2,60,876 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 78.91% झाले आहे.