तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मरक्कनममध्ये बनावट दारू (spurious liquor) प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जणांवर उपचार सुरू आहेत. हुच प्यायल्याने 16 जणांना पुद्दुचेरीतील जीप्मर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेश, शंकर आणि राणीवेल अशी मृतांची नावे आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) सरचिटणीस एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टिका केली तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
त्यांनी दावा केला की AIADMK राजवटीत बनावट दारूची विक्री बंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या, परंतु राज्यात हा मुद्दा पुन्हा गाजत आहे. अलीकडे, पलानीस्वामी यांनी सार्वजनिक शांतता बिघडवणार्या आणि गुन्हेगारीशी संबध असलेल्या लोकांशी संबध असल्याचा आरोप करत त्यांनी डीएमकेच्या नेतृत्वाखालील सरकारला फटकारले. तमिळनाडू सरकारने तमिळनाडू मद्य (लायसंस आणि परमिट) नियम, 1981 मध्ये बदल केल्यानंतर व्यावसायिक जागेवर आणि गैर-व्यावसायिक जागेवर मद्य ठेवणे आणि सेवा देणे सुलभ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे एक वाद निर्माण झाला आणि विरोधी पक्षांनी हे पाऊल "लोकविरोधी" म्हणून निंदा केली आणि म्हटले की यामुळे गुन्हेगारीला चालना मिळेल.