वंदे भारत अभियान अंतर्गत कुवतैहून 184 नागरिक भारतात दाखल; 29 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jun 29, 2020 11:53 PM IST
कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन धोरणाचे 30 जून नंतर काय होणार? याबाबत संबंध महाराष्ट्र आणि देशालाही उत्सुकता होती. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधीत केले आणि पुढे काय? या प्रश्नाचे बऱ्यापैकी उत्तर राज्यातील जनतेला मिळाले. असे असले तरी राज्य सरकारची निर्बंधांबाबतची अनिश्चितता कायम असल्याने कोणत्या भागातील दुकाने/व्यवहार सुरु असणार आणि कोणत्या भागांतील दुकाने / व्यवहार बंद असणार याबाबतचा संभ्रम कायम आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 30 जूनपासून लॉकडाऊन संपेल आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरु होतील असे वाटत असेल तर ते तसे नाही. त्या भ्रमात कोणी राहू नका. राज्यातील 80 टक्के जनतेस कोरोना लक्षणं नाहीत परंतू त्यांना संसर्ग नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे धोका अद्यापही टळला नाही. लॉकडाऊन संपला नाही परंतू, कार्यालयं, दुकानं व्यवहार सुरु करण्यास बऱ्याच अंशी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
दुसऱ्या बाजूला देशात कोरोना व्हायरस संकट असतानाच चीनने लद्दाख आणि इतर परिसरात काढलेल्या कुरापतींमुळे नवेच दुखणे भारतासमोर उभे ठाकरे आहे. दरम्यान, लद्दाखमध्ये ज्यांनी भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहिले त्यांना भारताने सडेतोड प्रत्युततर दिले आहे. भारत हे नेहमीच मैत्रीचा सन्मान करणारे राष्ट्र आहे. मात्र जर कोणी शत्रूत्व लादण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तरही देतो.
दरम्यान, चीन मुद्द्यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे सरकार विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना व्हायरस, लॉकडाऊन अपडेट्स, चीन मुद्दा, वाढते इंधन दर यांसह स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडमोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.