केरळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकीत 74,899 उमेदवार निवडणूक लढवणार, निवडणूक आयोगाची माहिती ; 27 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Nov 27, 2020 11:43 PM IST
राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकार काही महिन्यांतच पडणार अशी टीका विरोधकांकडून वारंवार होत होती. मात्र ठाकरे सरकारची आज वर्षपूर्ती झाली आहे. गेल्या वर्षी नाट्यमय घडामोडींनंतर ठाकरे सरकार सत्तेत आले. दरम्यान, वर्षपूर्तीनंतरही विरोधकांच्या टीका थांबवलेल्या नाहीत. पुढीत 3 महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडून भाजप सत्तेत येणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
गुजरात मधील राजकोट येथे कोविड रुग्णालयाला आग लागली असून त्यात 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट टाळण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज झाले आहे. लॉकडाऊनचा विचार अद्याप नसला तरी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळेच कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.