Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 19, 2024
ताज्या बातम्या
18 minutes ago

हैदराबादमध्ये मॉल सोडून इतर सर्व दुकाने गुरुवारपासून सुरू करण्यास परवानगी; 27 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | May 27, 2020 11:39 PM IST
A+
A-
27 May, 23:39 (IST)

हैदराबादमध्ये मॉल सोडून इतर सर्व दुकाने गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पर्यायी मार्गावर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने, लोक दुकानांमध्ये गर्दी करीत होते, त्यामुळे सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

27 May, 23:16 (IST)

25 मे रोजी अहमदाबाद ते गुवाहाटी स्पाइसजेटच्या SG-8194 (Ahmedabad-Delhi) आणि SG-8152 (Delhi-Guwahati) असा प्रवास करणारे दोन प्रवासी कोरोना व्हायरस सकारात्मक आढळले आहेत.

27 May, 22:43 (IST)

तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज जाहीर केले की, उद्या परिवहन महामंडळाच्या (RTC) बसेसना कर्फ्यू निर्बंधामधून सूट देण्यात येत आहे.

27 May, 21:56 (IST)

मुंबईत आज 1,044 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे आणि 32 मृत्युंसह एकूण संक्रमितांची संख्या वाढून 33,835 झाली आहे. आतापर्यंत एकूण मृत्यूंची संख्या 1,097 वर पोहोचली आहे.

27 May, 21:26 (IST)

मुंबईहून उत्तर प्रदेशकडे गेलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये दोन प्रवासी मृतावस्थेत आढळले आहेत. ही घटना मंडूआडीह रेल्वे स्थानकात घडली. अरुण केआर, स्टेशन मास्टर यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, 'सरकारी रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांपैकी एकजण आपल्या कुटुंबासमवेत प्रवास करत होता तर दुसरा एकटाच होता.'

27 May, 20:53 (IST)

महाराष्ट्रात आज 2,190 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 56,948 वर पोहोचली आहे.

 

27 May, 20:45 (IST)

जम्मू-काश्मीरमध्ये आज 162 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

 

27 May, 20:22 (IST)

लॉकडाऊन काळात पोलिसांवर 254 हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील 833 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

 

27 May, 19:56 (IST)

धारावीत आज 18 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,639 वर पोहोचली आहे.

 

27 May, 19:10 (IST)

चेंबूरमध्ये आतापर्यंत 1028 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 78 जणांचा मृत्यू झाला आहे. पी.एल. लोखंडे मार्ग कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित झाला आहे त्या ठिकाणी 305 जणांना कोरोनाची लागण झाली. असून दिवसेंदिवस या ठिकाणची रुग्ण संख्या वाढत आहे.

 

Load More

महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं संकट कायम आहे. सध्या देशभरात उन्हाचा तडाखादेखील वाढला असल्याने अनेक ठिकाणी सूर्यनारायण कोपल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान विदर्भातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राजस्थानमध्ये तापमानाचा पारा 50 अंशाच्या पार गेला आहे.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा फटका शेती आणि व्यापाराला देखील बसला आहे. दरम्यान नाशिकच्या मार्केटमध्ये काल कांदे विक्रीसाठी आले तेव्हा पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी भाव मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. हा दर आमच्या प्रवास खर्चापेक्षा देखील कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

कोरोनाच्या व्हायरसच्या जगभरातील थैमानाने आता जगभरात 54 लाखापेक्षा अधिक जणांना संक्रमित केले आहे. मागील 24 तासामध्ये सुमारे लाखभर नवीन कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.


Show Full Article Share Now