एआयआयएमएसचे डाक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 20 सेंटीमीटरचा चाकू काढला; 27 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Jul 27, 2020 11:37 PM IST
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची सकाळ धुव्वाधार पावसामुळे झाली आहे. सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. सायन, किंग्स सर्कल, हिंदमाता परिसरामध्ये पावसामुळे पाणी साचले आहे. दरम्यान सकाळपासूनच ढग दाटून आले होते त्यामुळे वातावरण देखील ढगाळ आहे.
महाराष्ट्रात आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. या दिवसाला धार्मिक महत्त्व असतं. मात्र यंदा कोरोना संकटकाळामुळे अद्यापही मंदिरं उघडण्यात आली नसल्याने भाविकांना श्रावणी सोमवारच्या पहिल्या दिवशी घरातच भगवान शंकराची पूजा करावी लागणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या मराठा आरक्षण बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढील 3 दिवसांत अंतिम सुनावणी पूर्ण होणार आहे. तसेच पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा खटला देखील आज सर्वोच्च न्यायलयात घेतला जाणार आहे.