गोवा येथे गुन्हे शाखेकडून 85 ग्रॅमचे MDMA जप्त करत तीन जणांना अटक ; 27 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Dec 28, 2020 12:00 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. 2020 मधील हा शेवटचा प्रोग्रॅम असणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. सध्या देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन, कोरोना व्हायरस लस, कोविड-19 नवा स्ट्रेन या बद्दल मोदी बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मोदी नेमकं कोणत्या विषयावर भाष्य करणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.
गोंदिया पोलिस आणि नक्षलविरोधी पथकाने काल संयुक्त कारवाईत दरेक्षे घाटाजवळील नक्षल लपण्याच्या ठिकाणाला सापळा लावला आणि 27 इलेक्ट्रिक डिटोनेटर्ससह स्फोटके जप्त केली.
देशात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा धोका आहे. त्यामुळेच संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाच्या तोंडावर महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशासह राज्यात थंडीची लाट पसरली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पारा घसरला असून नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आज मुंबईत आकाश काही अंशी ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.