मध्य प्रदेश: शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्री पदी; 23 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Mar 23, 2020 10:07 PM IST
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांना काळजी घेण्यासोबत घरातच बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाबाधितांच आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आपण सध्या फेज 2 मधून जात असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही गांभीर्याने घेण्यास सांगण्यात आले आहे. तर रविवारी देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीत आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी 6 ते 31 मार्च पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ लखनौ येथे 23 ते 25 मार्च लॉकडाउन, बिहार येथे 31 मार्च पर्यंत लॉकडाउन आणि उत्तर प्रदेशात 23 ते 25 मार्च पर्यंत लॉकडाउनचे आदेश स्थानिक सरकारकडून देण्यात आले आहेत.
दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासात युनायडेट स्टेटसमध्ये 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त AFP न्यूज ऐजंसी यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर डोनाल्ड यांनी त्यांच्याकडील काही माणसे चीनच्या मदतीसाठी पाठवण्यासाठी विचारले असता त्यांनी यासाठी नकार दिला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाची परिस्थिती असली तरीरी लॉकडाउन करु शकत नाही असे म्हटले आहे. कारण येथील बहुतांश लोक हे प्रत्येक दिवसाच्या रोजगारावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्रात कोरोनामुळे वीज ग्राहकांना आता सरासरी बिल दिले जाणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निर्णय घेतला आहे.