अंदमान आणि निकोबार येथे कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळले; 22 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Jul 23, 2020 12:09 AM IST
भारतात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्रात तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
देशातील अनेक दिग्गज कलाकार, नेतेदेखील कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी औरंगाबादमधील आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता भाजप पक्षातील एका आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाशी झुंजत असलेले बिहारमधील भाजपा आमदार सुनिल कुमार सिंह यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झालं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. या भूमिपूजनाकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाचं बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल, असं मत व्यक्त केलं आहे.