Heart Attack प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरी (Shivpuri) येथील मंदिरात (Temple) दर्शन करताना 21 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. मंदिरात दर्शनाच्या वेळी तो भजन करत असताना अचानक कोसळला. तरुणाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या अचानक निधनामुळे कुटुंब आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे, कारण तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होता. त्याला पूर्वी कोणतीही आरोग्य समस्या नव्हती.

प्राप्त माहितीनुसार, पवन रजक असे या मृत तरुणाचे नाव आहे. पवन रजक हा पोलिस स्टेशन परिसरातील फकीर कॉलनीचा रहिवासी होता. पवन सैन्य आणि पोलिस भरतीची तयारी करत होता. पवन दररोज व्यायाम आणि धावणे यासह कठोर फिटनेस दिनचर्या राखत होता. दररोज रात्री तो सिद्ध बाबा मंदिरात नियमितपणे उपस्थित राहत असे. घटनेच्या दिवशी, पवन त्याचा मित्र अभिषेक वैशसह नेहमीप्रमाणे मंदिरातील प्रार्थनेत सामील झाला. तथापि, जप सुरू असताना तो अचानक कोसळला. (वाचा - Rate of Heart Attack Increase On Mondays: सोमवारी हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! डॉक्टरांनी दिला इशारा; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या)

पवन अचानक खाली कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. परंतु, पवनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. पोलिसांनी पवनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक निधनाची नोंद केली आहे. (हेही वाचा -Heart Attack: वीकेंडला जास्त झोपणे तुमच्यासाठी फायदेशीर, हृदयविकार होऊ शकतात दूर)

अलिकडच्या काही वर्षांत हृदयाच्या संदर्भातील आजारांची सुरुवात अगदी तरुण वयात होताना दिसत आहे. इतकेच नाही तर तंदुरुस्त दिसणारे, आहार आणि व्यायामाची काळजी घेणाऱ्यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू होत आहे. यापूर्वी अनेक घटनांमध्ये जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.