राजस्थान मध्ये काही जिल्ह्यात उद्या पासुन पुन्हा कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागु ; 20 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Sep 20, 2020 11:36 PM IST
भारताभोवती कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून हा विषाणून गेले कित्येक महिने भारतात ठाण मांडून बसला आहे. यामुळे देशात (India) दिवसागणिक कोरोना संक्रमितांची वाढ देखील झपाट्याने होत आहे. याच धर्तीवर भारतात मागील 24 तासांत 12 लाखांहून अधिक कोविड चाचण्या (COVID-19 Tests) घेण्यात आल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड आहे. तसेच देशात आतापर्यंत एकूण 6.37 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढत असून राज्यात काल (19 सप्टेंबर) 21,907 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11,88,015 वर पोहोचली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 23,501 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 8,57,933 वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर मुंबई (Mumbai) शहरामध्ये काल कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 2,211 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील एकूण संक्रमितांची संख्या 1,82,077 वर पोहोचली आहे. आय सी एम आर पोर्टलवरील रिकंसीलेशन नुसार 676 बाधित रुग्ण दुहेरी नोंद असल्यामुळे प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत.