दिल्लीत मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; 20 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Jul 20, 2020 11:47 PM IST
महाराष्ट्रामध्ये आरोग्या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल (19 जुलै) च्या रात्री सर्वाधिक रूग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. काल रात्री महाराष्ट्रात 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुणे जिल्ह्यात रूग्णसंख्येने 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ठाणे, पुणे, डोंबिवली, कल्याणमध्ये अजूनही काही प्रमाणात लॉकडाऊन सुरू आहे. ठाण्यात आता कटेन्मेंट आणि हॉट्स स्पॉट्समध्ये लॉकडाऊन असेल. तर पुण्यामध्ये आजपासून दुसर्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाला आहे. पुण्यातील लॉकडाऊन 23 जुलै पर्यंत असेल. तर 31 जुलै पर्यंत ठाणे, कल्याण डोंबिवली च्या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
जगभरात कोरोना व्हायरसमुळे शिक्षण व्यवस्थेला फटका बसला आहे. राज्यात आता आजपासून सह्याद्री चॅनलवर टीली मिली हा नवा कार्यक्रम प्रसारित होणार आहेत. यामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना टेलिव्हिजनवर अभ्यासक्रमपर कार्यक्रम दाखवले जाणार आहेत.