Live
आंतरराष्ट्रीय इको लेबल 'Blue Flag' साठी भारतातील 8 समुद्रकिना-यांची शिफारस- प्रकाश जावडेकर; 18 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Sep 18, 2020 11:52 PM IST
केंद्रामध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. दरम्यान यामध्ये कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान हा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रामध्ये हळूहळू जनजीवन पुन्हा सुरळीत होत असताना राज्यात आजपासून एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे. यामध्ये सोशल डिस्टंसिंग पाळत पुन्हा बससेवा सुरू होईल.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
हवामान अंदाज पाहता आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबई शहरामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान काल मुंबईमध्ये कलम 144 ला विस्तारित करण्यात आल्यानंतर रात्रीपासून मुंबई पोलिसांकडून वाहनांची तपासाणी सुरू झाली आहे.