कोपरी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र आनंद महाडिक यांचे कोरोनामुळे निधन ;15 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Sep 15, 2020 11:59 PM IST
दिल्लीमध्ये यंदा कोरोना संकटकाळात पुरेशी खबरदारी घेत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. दरम्यान आज या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज राज्यसभा आणि लोकसभेमध्ये महत्त्वाची दुरूस्ती विधेयकं मांडली जाणार आहेत. दरम्यान हे अधिवेशन 1 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
महाराष्ट्रामध्ये आजपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू केला आहे. जगाच्या कोरोनाबाधित देशांच्या यादीमध्ये भारतातील महाराष्ट्र राज्याचा समावेश व्हावा इतक्या झपाट्याने सध्या राज्यात कोरोनाचा झपाट्याने पसार होत आहे. दिवसागणिक वाढती रूग्णसंख्या पाहता आता नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने गाव पातळीपर्यंत जाऊन लोकांना कोरोना व्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान आंतरराष्ट्रीय दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आज प्रतिष्ठीत ECOSOC चं सदस्यत्व भारत देशाने मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्राच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनचा सदस्य असणार आहे.