राजस्थान (Rajasthan) मधील बाडमेर (Barmer) येथे राम कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वादळी पावसामुळे मंडप कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
या दुर्घटनेबाबत केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले की, राजस्थान येथील बाडमेर येथे मंडप कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्देवी होता. मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांनी जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Collapse of a ‘Pandaal’ in Rajasthan’s Barmer is unfortunate. My thoughts are with the bereaved families and I wish the injured a quick recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 23, 2019
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ट्विट:
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे म्हटले आहे. मृतांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना दुःखाला सामोरे जाण्याचे बळ देवो. तसंच जखमी लवकर होतील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
जसोल,बाड़मेर में राम कथा के दौरान टेंट गिरने से हुए हादसे में बड़ी संख्या में लोगों की जान जाने की जानकारी अत्यंत दुखद, दुर्भाग्यपूर्ण है।ईश्वर से दिवंगतों की आत्मा को शांति प्रदान करने,शोकाकुल परिजनों को सम्बल देने की प्रार्थना है। घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 23, 2019
तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी स्थानिक प्रशासनाद्वारे बचावकार्य सुरु असल्याचे म्हटले आहे. संबंधित अधिकारी दुर्घटनेचा तपास करत असून जखमींना सर्वोतोपरी उपचार मिळतील आणि मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानीय प्रशासन द्वारा राहत एवं बचाव का कार्य किया जा रहा है।
सम्बंधित अधिकारियों को हादसे की जांच करने, घायलों का शीघ्र उपचार सुनिश्चित करने तथा प्रभावितों एवं उनके परिजनों को हरसंभव सहायता उपलब्ध कराने के निर्देश दिए हैं। #Barmer #Rajasthan
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 23, 2019
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाडमेर येथील जसोल गावात रामकथा ऐकण्यासाठी उभारण्यात आलेला मंडप आज संध्याकाळी अचानक कोसळला. त्यामुळे रामकथा ऐकण्यासाठी आलेले अनेक महिला व पुरुष त्याखाली दबले गेले. यातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.