Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
9 minutes ago

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 14 खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; 13 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | Apr 13, 2020 11:31 PM IST
A+
A-
13 Apr, 23:31 (IST)

महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 14 खासगी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या 14 कर्मचार्‍यांपैकी 5 पोलिस कॉन्स्टेबल, तर उर्वरित 9 लोकांमध्ये त्यांचे वैयक्तिक कर्मचारी, गृहसेवक आणि कार्यकर्ते आहेत. या सर्वांच्या कोरोना टेस्टचा निकाल काही वेळेपूर्वी आला. याआधीच जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला वेगळे ठेवले आहे. 

13 Apr, 23:09 (IST)

दिल्लीत आज 356 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, त्यामध्ये 325 पॉझिटिव्ह केसेस-स्पेशल ऑपरेशन्स अंतर्गत आहेत. आज राजधानीतील एकूण संख्या वाढून 1510 झाली आहे. एकूण मृतांचा आकडा 28 झाला आहे.

13 Apr, 22:25 (IST)

आज डब्ल्यूएचओ (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस हा स्वाइन फ्लूपेक्षा 10 पट जास्त प्राणघातक आहे. 

13 Apr, 21:41 (IST)

न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरस मृतांचा आकडा 10,000 पार झाला आहे. एएफपी न्यूज एजन्सीने याबाबत माहिती दिली.

13 Apr, 21:16 (IST)

आज महाराष्ट्रात 352 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 2334 वर पोहचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

13 Apr, 19:36 (IST)

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मुंबई शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत एका दिवसात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 150 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 1 हजार 549 पोहचली आहे. ट्वीट-  

 

13 Apr, 18:22 (IST)

भारतातही कोरोना विषाणूचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. देशात कोरोनामुळे गेल्या 24 तासात 51 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे आतापर्यंत देशापर्यंत 9 हजार 352 लोक कोरोनाबाधीत झाले आहेत. तर, एकूण 324 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ट्वीट- 

 

 

13 Apr, 17:39 (IST)

देशावर कोरोना विषाणूचे संकट वावरत असताना आपल्या जीवाची पर्वा करता नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणारे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे तोंडभरून कौतूक केले जात आहेत. यातच मुबई येथील रुग्णालयातील 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचया अहवाल निगेटिव्ह आला आहे. ट्वीट- 

 

 

13 Apr, 16:56 (IST)

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडात मागील 100  तासामध्ये एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेला नाही. तर आत्तापर्यंत 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

13 Apr, 16:22 (IST)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री Edappadi K. Palaniswami यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Load More

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते. राज्यात मुंबई शह्र अव्वल स्थानी असल्याने आता प्रशासनासामोर कोरोना व्हायरसची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान आहे. दाटीवाटीच्या भागामध्ये जाऊन कोरोनाबाधितांचा शोध घेण्याचं काम सध्या पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये आता कोरोनाचा रूग्ण आढळल्यास संबंधित परिसर सील केला जातो. तसेच कंटेन्मेंट भाग म्हणून त्याची घोषणा केल्यानंतर त्याभागातून ना नागरिक आत येऊ शकत ना बाहेर जाऊ शकत. आज पालिका प्रशासनाने मुंबईमधील लालबाग परिसरातील गणेश गल्ली देखील containment area म्हणून घोषित केली आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या 1982 कोरोनाचे रूग्ण असून त्यांच्यावर देशाच्या विविध भागांमध्ये उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्यामध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या पाहता रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशी क्रमवारी करण्यात आली आहे. तसेच उपचारांकरिता हॉस्पिटलमध्येही बेडस आणि हॉस्पिटल्स कोरोना लक्षणाच्या तीव्रतेनुसार राखीव ठेवण्यात आले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

भारतामध्ये कोरोना बाधितांचा आकडा आता 9000 च्या पार गेला आहे. तर बळींची संख्या 300 च्या पार पोहचली आहे.


Show Full Article Share Now