Advertisement
 
गुरुवार, जुलै 10, 2025
ताज्या बातम्या
21 hours ago

पुणे जिल्ह्यात 4717 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर ; 12 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Sep 12, 2020 11:58 PM IST
A+
A-
12 Sep, 23:57 (IST)

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत 4717 नवे रुग्ण आढळले असून 90 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5,059 वर पोहोचला आहे.

12 Sep, 22:58 (IST)

पुणे जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिका्यांनी दिले. यानंतर, जलद आणि अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टॅंकरवर रुग्णवाहिकेसारखे सायरन असणार आहेत.

 

12 Sep, 22:44 (IST)

हरियाणामध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,783 रुग्णांची व 24 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 91,115 वर तर मृत्यूंची संख्या 956 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 19,446 सक्रीय रुग्ण आहेत.

12 Sep, 22:12 (IST)

राजस्थानमध्ये मागील 24 तासांत 1699 नवे रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,00,705 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 1,221 वर पोहोचली आहे.

12 Sep, 22:05 (IST)

जम्मू-काश्मीर मध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासांत 1698 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 52,410 वर पोहोचली आहे.

12 Sep, 21:41 (IST)

मुंबईत मागील 24 तासांत 2,321 नवे रुग्ण आढळले असून 42 रुग्ण दगावल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यामुळे मुंबईत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 16 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 8106 वर पोहोचला आहे.

12 Sep, 21:21 (IST)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी आपला मुलगा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत 2 आठवड्यांकरिता अब्रॉडला जाणार आहेत. तेथून परतल्यावर ते अधिवेशनास हजेरी लावतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

12 Sep, 20:49 (IST)

राज्यात आज 22,084 नव्या कोरोना बाधितांची भर पडली असून 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 13,489 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 10,37,765 इतकी झाली आहे. त्यापैकी 7,28,512 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 2,79,768 सक्रीय रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

12 Sep, 20:36 (IST)

कोरोना बाधित रुग्णांवर त्वरीत उपचार व्हावे. तसंच त्यांना बेड नाकारु नये, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने खाजगी हॉस्पिटल्सना केल्या आहेत.

12 Sep, 20:06 (IST)

उद्धव ठाकरे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी संपूर्ण देशाची माफी मागावी. तसंच अशा प्रकराचा प्रसंग पुन्हा कोणाबरोबरही होणार नाही याची ग्वाही द्यावी, असे काल शिवसैनिकांकडू हल्ला झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी म्हटले आहे.

Load More

जगभरासह देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीवर नियंंत्रण मिळवण्यास सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 29 दिवसात 100 टक्क्यांहून अधिक वेगाने कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारल्याचे सांगितले होते. तर  आता % रिकव्हरी रुग्ण आणि %अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण कोरोनासंक्रमित रुग्णांच्या 3/4 पेक्षा अधिक (36 लाखांहून अधिक) जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 10.5 लाखांहून कमी अॅक्टिव्ह रुग्ण संख्या असल्याचे ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्राच्या नेतृत्वाखाली COVID19 च्या रुग्णांच्या चाचण्या आणि रुग्ण शोधून काढले जात आहेत. तसेच रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी उत्तम वैद्यकिय सोईसुविधा आणि होम क्वारंटाइनसाठी सुद्धा अशाच पद्धतीचे उपचार केले जात असल्याने मृत्यूदर कमी होत आहे.

दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 0.13 रुपयांनी घट झाली असून दर 81.86 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहेत. तसेच डिझेलची किंमतीत 0.12 रुपयांनी कपात झाली असून दर 71.93 प्रति लीटर रुपये झाले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड येथून पहिली ट्रेन मनमाड येथून प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली .

दरम्यान, महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन अंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. त्यानंतर शासनाने कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे.


Show Full Article Share Now