राज्यातील सर्व विद्यापीठांनी 13 ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून साजरा करावा. त्यासाठी 13 ते 20 ऑगस्ट या दरम्यान जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात यावा अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केल्या आहेत.

युट्युबर विनायक माळी याला कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. विनायकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. आपल्या खास शैलीच्या विनोदामुळे युट्यूब आणि सोशल मीडियावर विनायक माळी प्रसिद्ध आहे.

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील जंगलात तृणमूल नेत्याच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. दहा वर्षांच्या या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. तसेच 50 लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेपाळमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांमध्ये येत्या 17 ऑगस्ट रोजी संवाद होणार आहे.नेपाळचे भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्र हे नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी यांच्याशी चर्चा करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

वैद्यकीय, दंत महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्यण राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना म्हणजेच सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे अभार मानले आहेत.

बिहारमध्ये आलेल्या महापुराचा आणखी 2.16 लाख नागरिकांना फटका बसला आहे. त्यामुळे देगलूसह 16 जिल्ह्यांमधील सुमारे 77,18,788 नागरिक पूरग्रस्त झाले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील व्यंकटपुरम गावाजवळील वनक्षेत्रात आज एक हत्ती मृत सापडला. फॉरेस्ट रेंजरने सांगितले की, हत्तीच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. हा हत्ती सहा हत्तींच्या कळपातील एक होता.

महाराष्ट्रात कोरोना विषाणू चाचण्यांचे दर कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आता सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि रिपोर्टिंगसाठी 2200 रुपयांऐवजी 1900 रुपये, तर स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर येथून स्वॅब घेतल्यास 2500 रुपयांऐवजी 2200 आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास 2500 रुपये असे दर राहणार आहेत.

बुलंदशहर रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या सुदिक्षा भाटी हिच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत करा अशी मागणी आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 12,712 रुग्ण आढळून आल्याने आकडा 5,48,313 वर पोहचला आहे.

Load More

आपल्या नटखट लिलांनी गोपिकांना आपल्या मोहात पाडणा-या आणि जगाच्या कल्याणासाठी आपल्या सदैव आपले कृपाशिर्वाद आपल्या भक्ताच्या पाठीशी देणा-या नंदकिशोर कृष्णाचा जन्म गोकुळाष्टमी (Gokulashtami) या दिवशी मध्यरात्री झाला. म्हणून संपूर्ण भरारतभर हा दिवस कृष्णाष्टमी साजरा केला जातो. कृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत (Mathura) या उत्सवाला तर विशेष महत्व असते. यंदा कोरोना व्हायरसचे (Coronavirus) सावट असल्यामुळे अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. रात्री 12 वाजता मथुरेतील मंदिरात कृष्णाच्या प्रतिकात्मक मूर्तीला पाळण्यात घालून जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. त्यासोबतच मंगल आरती देखील झाली. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला म्हणजेच दहीहंडी चा उत्सव साजरा होतो. मात्र यंदा कोविड-19 मुळे दहीहंडीचा सार्वजनिक उत्सव करण्यात येणार नसल्यामुळे अनेक गोविंदा पथकाचा हिरमोड झाला.

मथुरेसह मध्य प्रदेश, नोएडा मध्ये जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे कोरोना व्हायरस स्थितीबाबत बोलायचे झाले तर, देशातील कोरोना बाधितांची संख्या 22,68,676 वर पोहचली आहे. त्यापैकी 15,83,490 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 6,39,929 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्य 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे.