Vande Bharat Mission अंतर्गत एअर इंडियाच्या विमानातून 170 जणांना अबू धाबी येथून हैदराबाद येणे आणले ; 11 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
May 11, 2020 11:42 PM IST
भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून सुरू असलेला लॉकडाऊन पाहता आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्या राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा चर्चा होणार आहे. सुमारे 3 वाजता ही मिटिंग होणार असून देशात विविविध भागांमध्ये कोरोनाचा आढावा घेऊन पुढील प्लॅन बनवला जाणार आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 62 हजारांच्या पार गेला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यसाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत.
एकीकडे कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानपरिषद निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 12 वाजता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आपला अर्ज दाखल करतील. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा आणि मुख्यमंत्री पद अबाधित ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशामध्ये कोरोनाचं संकट असलं तरीही सामान्यांच्या सोयीसाठी आता रेल्वे मंत्रालयाकडून हळूहळू रेल्वेची प्रवासी सेवा केली जाणार आहे. आज दिल्लीहून भारताच्या विविध जाण्यासाठी 15 गाड्यांचं ऑनलाईन बुकिंग सुरू होणार आहे.