पतंजलि च्या COVID 19 वरील औषधांमुळे 7 दिवसांत 100% रिकव्हरी, 45 रुग्ण कोरोनामुक्त; आयुष मंत्रालयाला सादर केलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा
Patanjali | (Photo Credits: ANI)

जगासह संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसने (Coronavirus) ग्रासले आहे. यावर कोणतेही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने संकटावर मात करणे कठीण झाले आहे. दरम्यान पतंजलि (Patanjali) ने कोरोना विषाणूवर रामबाण औषध शोधल्याचा दावा केला आहे. कोरोनिल हे कोरोना व्हायरसवर प्रभावी औषध असल्याचे योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी सांगितले असून यासंदर्भात काही रिपोर्ट्स देखील आयुष मंत्रालयाकडे (AYUSH Ministry) सादर केले आहेत. कोविड-19 (Covid-19) ग्रस्त रुग्णांच्या गटाला हे औषध देण्यात आले. त्यानंतर  3 दिवसांत 67% रिकव्हरी झाली असून 7 दिवसांत 100% रिकव्हरी दिसून आली. त्यामुळे 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले, असे या रिपोट्समध्ये म्हणण्यात आले आहे. (पतंजलि च्या COVID 19 वरील औषधांवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले?)

दरम्यान पतंजलि मेडिसिन्सने सादर केलेल्या रिपोट्मध्ये खोकला, ताप आणि इम्युनिटी बुस्टर साठी परवानगी मागितली होती त्यामध्ये कोरोना वायरसचा उल्लेख नसल्याचे उत्तराखंड आयुर्वेद डिपार्टमेंटने सांगितले होते. तसंच पतंजलि कडून सादर करण्यात आलेला रिपोर्ट पाहून त्याची पडताळणी करु. त्यानंतरच औषधाला परवागनी द्यायची की नाकारायची हे ठरवण्यात येईल, असे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले होते.

ANI Tweet:

पतंजलिच्या कोरोना व्हायरस वरील औषधांच्या जाहीरातींवर बंदी घालण्यात आली आहे. देशात सध्या कोरोनील या औषधावरुन वाद सुरु आहेत. दरम्यान औषध निर्मिती किंवा परवाना मिळवण्यात काही गैर नसल्याचे स्पष्टीकरण पतंजलि कंपनीकडून देण्यात आले आहे.