पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, 'गुजरात आणि भाजपमधील नाते हे अतूट आहे. हा स्नेह पुन्हा एकदा 8 पोट-मतदानात दिसून आला. या समर्थनाबद्दल मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो. रूपाणीजींच्या नेतृत्वात स्थानिक युनिट आणि राज्य सरकारच्या कार्याचे मी कौतुक करतो.'

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने दुबई येथे झालेल्या शिखर लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सने पराभूत करून पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावले

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या फॅक्टरीची भिंत कोसळून सहा मजूर ठार, तर दहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 535 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 2,65,677 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यू संख्या 10,481 झाली आहे.

Manipur Bypolls: मणिपूर बायपोल्समध्ये भारतीय जनता पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत आणि अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली.

येत्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी कॉंग्रेसने दोन उमेदवारांची यादी महाराष्ट्र विधानपरिषदेला जाहीर केली. यामध्ये अभिजित वंजारी आणि जयंती आसगावकर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 3,791 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 17,26,926 वर पोहोचली आहे. आज 46 रुग्णांच्या मृत्यूसह एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 44,435 झाली आहे.

गुजरात बायपोल्स 2020 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आठही जागा भाजपाने जिंकल्या आहेत.

सायंकाळी 5.30 पर्यंत 2.7 कोटी ईव्हीएम मतांची मोजणी झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण 4 कोटींपेक्षा जास्त मतदान झाले. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली.

पुणे शहरात आज नव्याने 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 63 हजार 619 इतकी झाली आहे. 

Load More

तीन टप्प्यात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 पासून सुरुवात होणार आहे. 243 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 71, दुसऱ्या टप्प्यात 94 आणि तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची महाआघाडी यांच्यात लढत झाली. त्यामुळे सत्ताधारी जेडीयू आणि भाजपला मतदार पुन्हा संधी देतात का? की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामुळे राजद आणि काँग्रेस यांची महाआघाडी मुसंडी मारणार, हे आज दिवसभरात स्पष्ट होईल.

दरम्यान, मध्य प्रदेशातील उप विधानसभेच्या 28 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी देखील आजच होणार आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाले आणि सत्ता शिवराजसिंह चौहान यांच्याकडे सोपवण्यात आली. त्याचवेळी राज्यातील तीन आमदारांच्या निधनानंतर 25 कॉंग्रेसच्या आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

आज दिवसभरात बिहार, मध्यप्रदेश निवडणूक निकालांची धामधुम असली तरी देश-परदेशातील इतर महत्त्वाच्या घडामोडी देखील आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान, आज आयपीएल 2020 चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगणार आहे. त्यामुळे आज आयपीएल ट्रॉफी कोण पटकवणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्येही उत्सुकता वाढली आहे.