Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

आसाम विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून 26 उमेदवारांची यादी जाहीर; 10 मार्च 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Mar 10, 2021 11:26 PM IST
A+
A-
10 Mar, 23:25 (IST)

आसाम विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून 26 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

10 Mar, 22:39 (IST)

पुण्यात 1 फेब्रुवारीला 1300 कोविड-19 केसेस होते. ही संख्या महिन्याभरात 7000 वर पोहोचली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे पुणे महापौरांनी सांगितले आहे.

10 Mar, 22:13 (IST)

औरंगाबाद जिल्ह्यात 532 नव्या कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 54,439 वर पोहोचली आहे. 

10 Mar, 21:19 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 13,659 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 22,52,057 वर पोहोचली आहे.

10 Mar, 21:14 (IST)

नागालँड: मोकोकचंग भागात आज रात्री 8.33 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. 3.6 रिश्टेर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती.

10 Mar, 20:41 (IST)

देशात आज संध्याकाळा 7 वाजेपर्यंत 9,22,039 जणांचे लसीकरण झाल्याची सरकारने माहिती दिली आहे.

10 Mar, 20:29 (IST)

उल्हासनगर येथील डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याने घटनास्थळी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

10 Mar, 20:21 (IST)

दुबईतून चैन्नई विमानतळावर आलेल्या  व्यक्तीकडून 1.35 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

10 Mar, 19:48 (IST)

जम्मू कश्मीर येथे कोरोनाचे आणखी 97 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 3 जणांचा बळी गेला आहे.

10 Mar, 19:33 (IST)

ममता बॅनर्जी यांचा निवडणूक 200 टक्के पराभव होणार असून 100 टक्के भाजपचा विजय होईल असे सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले आहे.

Load More

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्हे, शहरं येथे कडक निर्बंध लादले जात आहेत. तर एकीकडे लसीकरणही सुरु आहे. कोविड-19 च्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत सध्या तरी लॉकडाऊनची गरज नसल्याचे बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे.

जळगाव, नाशिक, नागपूर, अकोला यांसारख्या ठिकाणी कोरोना रुग्णवाढीमुळे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर उद्या महाशिवरात्री निमित्त जेजुरी येथे दोन दिवसांची जमावबंदी असणार आहे. कोकणातील कुणकेश्वर मंदिरही बंद असणार आहे. तसंच महाशिवरात्रीचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

सध्या राज्यात मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर या दोन मृत्यूंची जोरदार चर्चा आहे. या दोन मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणात दररोज नवी माहिती, अपडेट समोर येत आहे. त्यामुळे पुढे ही प्रकरणं कशी मार्गी लागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Show Full Article Share Now