येत्या 1 जुलै पासून विविध क्षेत्रातील कामाच्या नियमात बदल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी महिना अखेपूर्वी राहिलेले कामे करा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बदललेल्या नियमांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महिना सुरु होण्यापूर्वीच सूचना देण्यात आली आहे.
पुढील महिन्यापासून ऑनलाईन व्यवहार, होम लोन याच्यासह विविध विभागाच्या नियमात बदल होणार आहेत. त्यामुळे बदलेल्या नियमांमुळे ग्राहकांच्या आयुष्यात बदलाव होणार असल्याचे म्हटले जात आहे. तर 'या' नियमात जुलैपासून बदल होणार आहे.
> ऑनलाईन व्यवहार
जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असल्यास तुम्हाला 1 जुलैपासून या कामांसाठी दिलासा मिळणार आहे. तर आरबीआयने सामान्य नागरिकांना RTGS बाबत दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत NEFT च्या देवाणघेवाणवर सुद्धा लावण्यात येणारे शुल्क हटवण्यात येणार आहेत.
> होम लोनमध्ये बदल
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होम लोन संदर्भातील काही नियमात बदल करत आहे. तर रेपो रेटनुसार ग्राहकांना होम लोन देण्यात येणार आहे.
>वाहन खरेदी महागणार
तुम्ही जर महिंद्रा किंवा मारुती कंपनीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास त्याच्या किंमतीत वाढ होणार आहे.
>कमी कालावधीमधील सेव्हिंगवरील व्याजदरात कपात
प्रोव्हिडेंट फंड (PPF), सुकन्या योजना किंवा नॅशनल सेव्हिंग स्किम (NSC) अंतर्गत पैसे गुंतवणार असल्यास तुम्हाला त्यावरील व्याजदरात कपात होणार आहे. लवकरच सरकारकडून याबद्दल नोटीस जाहीर करण्यात येणार आहे. तर जुलै-सप्टेंबर महिन्यासाठी व्याजदरात 0.30 टक्के कपात होण्याची शक्यता आहे.
>BSBD अकाउंटचे नियम बदलणार
1 जुलैपासून बेसिक सेव्हिंग अकाउंटसह काही नियमात बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना या खात्याअंतर्गत झिरो बॅलेंस खाते सुरु करता येणार आहे. त्याचसोबत ऑनलाईन पद्धतीने पैसे भरणे किंवा पाठवणे यावर शुल्क आकारणा जाणार नाही आहे.
त्यामुळे नागरिकांनी येत्या पुढील महिन्यापूर्वी राहिलेले कामे पूर्ण करा. तसेच बदललेल्या नियमांमुळे काही प्रमाणात फायदासुद्धा होणार आहे.