Mumbai News: मुंबई विमानतळावरून कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटकडून (AIU) दोन बहिणींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1.17 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. फरिन सगीर खान (वय २५) आणि अरफिना सगीर खान वय (२२) शुक्रवारी रात्री जेद्दाहून विस्तारा फ्लाईट UK 236 वर आले आणि अधिकाऱ्यांनी थांबवण्यापूर्वी ग्रीन चॅनेलमधून गेले. गेल्या चार दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावरून ३ किलोचे सोने १.६० कोटी किंमतीचे सोने जप्त करण्यात आले होते. हेही वाचा- मुंबई विमानतळ कस्टम्सने जप्त केले 16.8 कोटी रुपयांचे 2.4 किलो हेरॉईन;
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर उतरल्यावर बहिणींची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना त्यांच्या अंडरवेअरमध्ये सोने सापडले. बहिणींना चौकशीसाठी थांबवून घेतले त्यानंतर त्यांनी सांगितले की, मोहम्मद नावाच्या व्यक्तीने त्यांना मुंबईला सोने घेऊन जाण्यास सांगितले आहे. या कामासाठी त्यांना प्रत्येकी १०,००० रुपये देण्यात आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी बहिणींना अटक करून शनिवारी कोर्टात हजर केले आहे त्यांना पुढील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबई विमानताळावर एकच खळबळ उडाली आहे. दोघींवर सोने तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आरोपींकडून पासपोर्ट आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेत.