Photo Credt- X

Adar Poonawalla: एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम (L&T Chairman SN Subrahmanyan)यांच्या 90 तासांच्या कामाच्या आठवड्याच्या विधानावरून सुरू असलेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यावर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला (Serum Institute CEO Adar Poonawalla) यांनी जास्त कामाच्या तासांच्या कल्पनेवर त्यांची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. पूनावाला यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, "माझी पत्नी एन पूनावाला या मला अद्भुत समजताच, त्यांना रविवारीदेखील माझ्याकडे पाहत राहणे आवडते. त्याशिवाय, दर्जेदार काम हे कामाच्या प्रमाणतेपेक्षा नेहमीच महत्त्वाचे असते." असेही ते म्हणाले.

यापूर्वी दिपीका पादूकोण, राजीव बजाज, आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. यापूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या विषयावर वक्तव्य केले होते, माझी पत्नी सुंदर आहे, मला तिच्याकडे पाहणे आवडते, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले होते. आनंद महिंद्रा यांनी शनिवारी म्हटले केले की, कामाच्या प्रमाणात नव्हे तर कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण, जग 10 तासांत बदलू शकते. आठवड्यातून 90 तास काम करण्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर महिंद्रांनी अशा पद्धतीने दिले.

'माझ्या पत्नीला रविवारीही माझ्याकडे पाहत राहणे आवडते'

आनंद महिंद्रा यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल आदर व्यक्त करत म्हणाले की, 'मला वाटतं ही चर्चा चुकीच्या दिशेने जात आहे, कारण ही चर्चा कामाच्या प्रमाणात आहे. मी जे म्हणतोय ते असे आहे की आपण कामाच्या प्रमाणावर नव्हे तर कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा 40 तास, 70 तास किंवा 90 तासांचा प्रश्न नाही. तुम्ही काय निकाल देत आहात? जरी ते 10 तासांचे असले तरी, तुम्ही 10 तासांत जग बदलू शकता.