Pregnant woman made to clean blood-stained bed after husband's death

MP: मध्य प्रदेशातील दिंडोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गडासराय बजाग रुग्णालयातील  लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. येथे, एका महिलेने  पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेला रुग्णालयात तिच्या पतीच्या मृत्यूनंतर रक्ताने माखलेले पलंग साफ करायला लावले आहे.  व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॉस्पिटलने नर्सिंग ऑफिसर आणि वॉर्ड बॉयविरोधात नोटीस बजावली आहे. याप्रकरणी दिंडोरी सीएमएचओ डॉ. रमेश मारवी म्हणाले, "ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. रुग्णालयातील कर्मचारी, ज्यात वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी आणि वॉर्ड बॉय यांचा समावेश आहे. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर आम्ही नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. उत्तर मिळाल्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यानंतर याप्रकरणी आवश्यक ती कारवाई केली जाईल. हे देखील वाचा: No Mega Block On Nov 3: भाऊबीजेच्या दिवशी मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉक मधून प्रवाशांची सुटका; तिन्ही मार्गावर सेवा सुरळीत

दिंडोरी येथील रुग्णालयाचे लज्जास्पद कृत्य

दिंडोरीतील गडसराय पोलीस ठाण्यांतर्गत लालपूर गावात दोन पक्षांमध्ये झालेल्या भांडणात एका वृद्धाची त्याच्या दोन मुलांसह लाठ्या-कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. मृतांचे मृतदेह गडसराय रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी रूग्णालयातील बेडवर मृताच्या गर्भवती पत्नीने रक्त स्वच्छ केले. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर विरुद्ध नोटीस बजावली आहे.