Mother Dairy (PC- Wikimedia Commons)

Mother Dairy Milk Price Hike: दिल्ली एनसीआर (NCR) मध्ये सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. मदर डेअरीने (Mother Dairy) पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली आहे. सोमवारपासून हे दर लागू होतील. दिल्ली एनसीआरमध्ये यावर्षी दुधाच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

मदर डेअरीने फुल क्रीम दुधात लिटरमागे 1 रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर टोकनयुक्त दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मदर डेअरी कंपनी ही दिल्ली एनसीआरमधील सर्वात मोठी दूध पुरवठा करणारी कंपनी आहे. मदर डेअरी दररोज 30 लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा करते. (हेही वाचा -West Bengal Shocker: पश्चिम बंगालमध्ये श्रद्धा वॉकर हत्याकांडाप्रमाणे मुलाने आईच्या मदतीने केली वडिलांची हत्या; विल्हेवाट लावण्यासाठी केले मृतदेहाचे तुकडे)

सोमवारपासून फुल क्रीम दूध आता 63 रुपये/लिटरऐवजी 64 रुपये/लिटर दराने मिळणार आहे. दुसरीकडे, टोकन दूध 48 रुपयांऐवजी 50 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले की, फुल क्रीम दुधाच्या अर्धा लिटर पॅकेटच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे ही वाढ जनतेला काहीसा दिलासा देणारी आहे.