MHA Extends Guidelines for COVID19: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून पूर्वीच्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू
गृह मंत्रालय (Photo Credits: ANI)

MHA Extends Guidelines for COVID19: गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) आज एक आदेश जारी केला आहे. या गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मात्र, जागतिक पातळीवर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून गृहमंत्रालयाकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सुचना 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे देशात वेळीचं योग्य सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा भारतातदेखील ब्रिटनप्रमाणे नव्या कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ शकतो.

दरम्यान, गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार, कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार, देशात 31 जानेवारी 2021 पर्यंत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, कंटेनमेंट झोनमध्ये योग्य काळजी घेण्यासाठी नियम बनविण्यात आले आहेत. या झोनमध्ये निर्धारित केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. (हेही वाचा - Guidelines For New Year Celebration: कोरोना महामारीमुळे घरातूनच नववर्षाचे स्वागत करा; राज्य सरकारकडून 31 डिसेंबरसाठी महत्त्वाच्या गाइडलाइन्स जारी)

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, नवीन कोरोनाग्रस्त प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असली तरी जागतिक स्तरावर कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन योग्य प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.