Andhra Pradesh: सेल्फी काढण्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्यात मारली उडी, हल्ल्यात 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Lion | Twitter

Man Jumps Into Lion's Enclosure To Click Selfie: आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील व्यंकटेश्वर प्राणीसंग्रहालयात गुरुवारी एका 38 वर्षीय पुरुषाने सेल्फी काढण्यासाठी आठ वर्षांच्या नर एशियाटिक सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारली. यावेळी सिंहाने त्याच्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. सिंहाने त्या व्यक्तीच्या मानेवर हल्ला केला, परिणामी त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीने सिंहासोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्या पिंजऱ्यात प्रवेश केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. मृत व्यक्तीचे नाव प्रल्हाद गुजर असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील प्रल्हाद गुजर दुपारी चारच्या सुमारास प्राणीसंग्रहालयात पोहोचले आणि प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला.

पाहा पोस्ट: 

प्रवेश केल्यानंतर आतील बाजूस असलेल्या सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चेतावणीला न जुमानता मद्यधुंद अवस्थेतील प्रल्हाद गुजर  कथितरित्या कुंपणात घूसला होता. यावेळी तो सिंहासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना सिंहाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. या घटनेनंतर प्राणिसंग्रहालयात प्रवेश बंद करण्यात आला होता.