Stray Dogs | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bhopal Shocker: मध्य प्रदेशमधून प्राण्यांवरील क्रूरतेची (Animal Cruelty) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने भोपाळमध्ये एका भटक्या कुत्र्याला (Stray Dog) चिरडल्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुत्र्याने त्याची चप्पल चावल्यामुळे आरोपीने त्याची गाडी त्याच्यावर चालवली. शुक्रवारी, 21 फेब्रुवारी रोजी एका प्राणी हक्क कार्यकर्त्याने त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आतिफ खान (28) असे त्याचे नाव आहे. (Hathras Stampede Case: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात 'Bhole Baba' ला मिळाली क्लीन चिट, आयोजकांना ठरवले जबाबदार, झाला होता 121 लोकांचा मृत्यू)

श्यामला हिल्स परिसरातील अंसल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्या सुनीता जोशी यांनी शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना १४ फेब्रुवारी रोजी आरोपीने एका भटक्या कुत्र्याला त्याच्या गाडीखाली चिरडल्याची माहिती दिली. सुनीता जोशी यांनी पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही दिले. व्हिडिओमध्ये आरोपी रस्त्यावर बसलेल्या कुत्र्यावर गाडी चावताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, फुटेजमध्ये आरोपीने जाणूनबुजून कुत्र्यावर गाडी चालवली.

तर, आपल्या बचावात त्याने म्हणाले की त्यांना रस्त्यावर कुत्रा दिसला नाही. म्हणून गाडी त्याच्यावर गेली. श्यामला हिल्स पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक आर.एस. कुश्तवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासानंतर या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल.