Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात मोठी दुर्घटना; तेलाच्या टँकरमध्ये साफसफाई करणाऱ्या सात मजुरांचा मृत्यू
Seven laborers die in oil tanker (PC- ANI)

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील काकीनाडा (Kakinada) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. तेल कारखान्याचे टँकर साफ करताना सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. गुदमरल्.ाने मजुराचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, रागमपेठ गावाजवळ खाद्यतेलाचा कारखाना आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार मृत हे पेद्दापुरम मंडलातील पडेरू आणि पुलीमेरू येथील रहिवासी आहेत. (हेही वाचा - उत्तर प्रदेशात पीलीभीत मध्ये तरूणाचा चायनीज मांज्याने चिरला गळा)

एका प्रत्यक्षदर्शीने अपघाताची माहिती दिली आहे. आधी एक मजूर टाकीत शिरला, तो बाहेर न आल्याने बाकीचे मजूरही त्याच्या पाठोपाठ टँकरमध्ये शिरल्याचे त्यांनी सांगितले.

मजुरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नातेवाइकांनी कारखाना व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. कारखान्याकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था करण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.