Stop Rape (Representative image)

Madhya Pradesh Rape Case:  मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका गावात एका 17 वर्षीय मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा घडना उघडकीस आली आहे. रविवारी ही घटना घडली आहे. जिल्ह्यात अवघ्या चार दिवसांत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी या जिल्ह्यात एका मुलीवर क्रूरतेने अत्याचार करत तीच्यावर बलात्कार केल्याची घडना ताजी असताना पुन्हा निर्दयीपणाची घटना घडली आहे, त्यानंतर किशोरवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या तक्रारीचा हवाला देत रामनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी आदित्य नारायण धुर्वे यांनी सांगितले की, आरोपी विजय साकेत (19) ने शुक्रवारी दुपारी पीडीत मुलीवर बलात्कार केला. परिसरात वाढत्या बलात्काराच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली

आरोपींनी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे त्यांनी सांगितले.मुलगी घाबरली आणि घरी परतल्यानंतर तिने तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी कुटूंबाने पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केलीय.पोलिसांनी आरोपीवर  भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार बलात्कार, अपहरण आणि पीडितेला धमकावल्याबद्दल गुन्हा नोंदवला आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली, असे पोलिस अधिकाऱ्याने माध्यमासमोर सांगितले.

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार 

गुरुवारी, सतना जिल्ह्यातील मैहर शहरातील एका प्रसिद्ध मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या ट्रस्टसाठी काम करणार्‍या दोन पुरुषांनी एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला, तिला अनेक वेळा चावले आणि क्रूरपणे अत्याचार केले, असे पोलिसांनी आधी सांगितले. या घटनेनंतर रवींद्र कुमार आणि अतुल भाडोलिया या दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि स्थानिक प्रशासनाने शनिवारी त्यांची घरे पाडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.