देशात लोकसभा निवडणूका 2019 (Loksabha Elections 2019) ची घोषणा झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. अशातच प्रत्येक राजकीय पक्ष बॉलिवूड सेलिब्रेटींची मदत घेत आहे. विविध राजकीय पक्षातून वेगवेगळ्या सेलिब्रेटींची नावे समोर येत असताना आता बॉलिवूडचा संजू बाबा उर्फ संजय दत्त देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून संजय दत्त (Sanjay Dutt) निवडणूकीच्या मैदात उतरु शकतो, असे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये संजय दत्त आम आदमी पक्षाचे नेता कुमार विश्वार (Kumar Vishwas) यांना टक्कर देऊ शकतात. राजकारणात नशीब आजमवण्याची संजय दत्तची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही 2009 च्या समाजवादी पक्षातून (Samajwadi Party) लोकसभा निवडणूक लढवणार होता. मात्र कोर्टाने शिक्षेतून सुटका न केल्यामुळे ती निवडणूक संजय दत्तला लढवता आली नाही. अक्षय कुमार BJP कडून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार?
कुमार विश्वास काँग्रेसच्या तिकीटावरुन निवडणूक लढवणार आहे. तर एसपी-बीएसपी बॉलिवूड स्टार संजय दत्तला निवडणूकीची संधी देऊ शकेल. मात्र यासंदर्भात राजकीय पक्ष किंवा संजय दत्त यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
एप्रिल 1993 मध्ये संजय दत्त याला टाडा एक्ट (TADA Act)या कलमाअंतर्गत अटक केली होती. त्यानंतर 5 मे, 1993 साली सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र 1994 मध्ये त्याचा जामीन रद्द करण्यात आला.
संजय दत्त लवकरच करण जोहरच्या 'कलंक' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट अशी तगडी स्टार कास्ट आहे.