Delhi Lockdown: राजधानी दिल्लीत कोरोनाच्या स्थितीत सुधारणा न झाल्यामुळे केजरीवाल सरकारने लॉकडाऊन कालावधी आणखी एका आठवड्याने वाढविला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांनी यासंदर्भात घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत सुरू असलेले लॉकडाऊन आणखी एका आठवडाने वाढविण्यात आले आहे. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी हे लॉकडाउन 3 मे पर्यंत सुरू राहील. दिल्लीत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. म्हणून आम्ही राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की, "कोविड-19 दिल्लीत वेगाने पसरत आहे. त्यामुळे आम्ही यापूर्वी सहा दिवसांचा लॉकडाउन लागू केला होता. जो उद्या सकाळी 5 वाजता संपणार होता. कोरोनाला सामोरे जाण्यासाठी लॉकडाउन हे शेवटचे शस्त्र आहे. सध्या परिस्थितीत सुधारणा नाही. लॉकडाऊन काळावधी वाढवायला हवा, असं बऱ्याच लोकांचं मत आहे. आता दिल्लीत सोमवार 3 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे." (वाचा - Covid-19 Second Wave in India: कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत भारताला जगभरातून मदतीसाठी पाठिंबा; पाकिस्तान ते अमेरिका अनेक देश आले पुढे)
दिल्लीतील कोरोना प्रकरणामुळे तेथील परिस्थिती भयावह बनत आहे. बर्याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे आणि बेडची कमतरता आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने लॉकडाऊन कालावधी 6 दिवसांपर्यंत वाढविला आहे. राष्ट्रीय राजधानीत, काही दिवसांत कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.
Lockdown in Delhi extended by a week amid COVID-19 spike
Read @ANI Story | https://t.co/SULBGEemDP pic.twitter.com/9t5GHsP3GS
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2021
गेल्या 24 तासांत 24 हजाराहून अधिक नवीन कोरोना प्रकरणे
दिल्लीत शनिवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,103 नवीन रुग्ण आढळले. यावेळी, एकाच दिवसात जास्तीत जास्त 357 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिल्लीत हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठी आकडा आहे. दिल्लीतील पॉजिटिव्हीटी रेट 32.27 टक्क्यांवर पोहोचले आहे. राजधानीत सक्रिय प्रकरणांची संख्या 93,080 वर पोचली आहे.