Kota Student Suicide: कोटामध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, यावर्षात आतापर्यंत 28 विद्यार्थ्यांची आत्महत्या
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. राजस्थानातील कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. फरिद हुसैन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. फरिद हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. तो शहरातील वक्फनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. आपल्या खोलीत गळफास लावून जीवन संपवलं. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा - Madhya Pradesh Shocker: भररस्त्यात 7-8 हल्लेखोरांनी तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या, जबलपूर येथील खळबळजनक घटना)

फरिदसोबत इतर काही विद्यार्थी देखील राहत होते. सहकाऱ्यांनी त्याला संध्याकाळी 4 वाजता पाहिलं होतं. मात्र 7 वाजेपर्यंत तो खोलीबाहेर आलाच नाही. त्याच्या मित्रांनी त्यानंतर दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर मुलांनी घराच्या मालकांना याबाबत सूचना दिली. मालकाने पोलिसांना याबाबत कळवलं त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

राजस्थान सरकारने यावर्षी कोटामधील विद्यार्थ्यांना कोचिंग देण्याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. 3 ऑक्टोबर रोजी कोचिंग सेंटर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.  सध्या आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरू आहे. यावर्षी आतापर्यंत 28 विद्यार्थी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक आहे.