Kerala High Court (Photo Credits: X)

HC on Animal Cruelty: भारतात सण-उत्सव हे नेहमीच आनंदात साजरे केले जातात. त्यासाठी अनेकवेळा मिरवणूका काढल्या जातात. मिरवणूकांमध्ये प्राण्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश होतो.

त्यावर केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवले आहे. मिरवणूकांदरम्यान हत्तींवर काही जण स्वार होतात. मुक्या प्राण्यावर अनेकवेळा अत्याचार (Animal Cruelty)होतात. हे क्रूर असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिकृत नियम लागू होईपर्यंत मंदिराच्या उत्सवादरम्यान परेड आणि इतर सामाजिक कार्यक्रमांदरम्यान हत्तींचे शोषण (Elephant Cruelty)होण्यापासून ते संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल, केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती ए के जयशंकरन नांबियार आणि न्यायमूर्ती गोपीनाथ पी यांच्या खंडपीठाने परेड दरम्यान हत्तींवर होणाऱ्या अत्यंत क्रूरतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि अशा प्रथा बंद करण्याचे आवाहन केले. राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे की ब्लू व्हेल जर जमिनीवर राहिली असती तर हत्तींसारखेच नशीब भोगावे लागले असते. "हा माणसाचा अहंकार आहे की तो आपल्या देवाती मूर्ती जमिनीवरच्या सर्वात मोठ्या प्राण्यावर ठेवण्याची इच्छा ठेवतो. त्यामुळे 'देवाचे आभार मानतो की ब्लू व्हेल जमिनीवर नाही. नाहीतर आपणही परेड केली असती आणि हत्तींचा नाश झाला असता'. हे काही नाही 'हा फक्त अहंकार आहे', अशी टिप्पणी न्यायमूर्ती गोपीनाथ यांनी व्यक्त केली.