Anushka Shankar and PETA donate an 800 kg elephant made of steel to Kerala's Kombra Sri Krishna Swamy temple

Kerala: ग्रॅमी नॉमिनी सतारवादक अनुष्का शंकर आणि प्राणी हक्क संघटना पेटा इंडिया यांनी त्रिशूरमधील कोंबरा श्रीकृष्ण स्वामी मंदिराला एक खोटा हत्ती दान केला आहे.  खऱ्या हत्तींची गरज पडू नये आणि सगळ्या विधी मंदिराला करण्यात याव्या त्यासाठी हा खोटा हत्ती देण्यात आला आहे, नैतिक आणि शाश्वत प्रथांना प्रोत्साहन मिळावे, हा या देणगी मागचा खरा उद्देश आहे. खऱ्या हत्तींचा वापर सोडून प्राण्यांना जंगलात राहण्याची मुभा देण्याच्या मंदिराचा निर्णय आहे. स्टीलपासून तयार केलेला 3 मीटर उंच, 800 किलो वजनाचा खोटा हत्ती खऱ्या हत्ती सारखे डोके हलवतो, कान आणि डोळ्यांची हालचाल आणि अगदी पाण्याच्या फवारणीही करतो. पेटा इंडियाचे केरळमधील हे पाचवे आणि त्रिशूरमधील दुसरे दान आहे. पाच मोटारींनी चालणारे आणि व्हीलबेसवर बसवलेले हे स्टीलचे हत्तीचे मॉडेल मंदिरातील विधी आणि मिरवणुकीदरम्यान सहज पणे वापरता येतील. या हत्तीचे नाव कोंबरा कन्नन असे ठेवण्यात आले आहे. अहवालानुसार, केरळमध्ये २०१८ ते २०२३ या कालावधीत १३८ हत्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे हा उत्तम उपाय आहे. हेही वाचा: Leopard Attack Caught on Camera in UP: बिबट्याच्या हल्ल्यात 6 गावकरी जखमी; उत्तरप्रदेशमधील धक्कादायक व्हिडीओ समोर (Watch Video)

 येथे पाहा, व्हिडीओ 

मंदिरांमध्ये स्टीलच्या हत्ती हा चिंतांकडे लक्ष देताना  विकास कसा होतो यातील बदल दर्शवितो. दरम्यान, हा प्रयोग योग्य प्रकारे कार्य केल्यास केरळ येथील अनेक मंदिरात असे स्टीलचे खोटे हत्ती दिसून येतील. यामुळे मंदिराला  खऱ्या हत्तींना ठेवायची गरज पडणार नाही. व्हिडीओमध्ये दिसत असल्या प्रेमाने खोटा हत्ती पूर्णपणे खऱ्या हत्ती सारखा दिसत असून तसेच कान हलवत आणि शेपटी हलवत असल्याचे दिसून येत आहे.