Lockdown: कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांना लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परंतु, नागरिकांकडून या सुचनांचे वारंवार उल्लंघन होतं आहे. कर्नाटकमधील भाजपा आमदाराच्या मुलाने घराबाहेर पडत राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी (Horse Riding) केल्याची घटना समोर आली आहे. त्याचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे घोडेस्वारी करताना त्याने तोंडाला मास्कही लावलेला नाही.
दरम्यान, या व्हिडीओत भाजपा आमदार निरंजन कुमार यांचा मुलगा म्हैसूर-ऊटी राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी करत आहे. सरकारकडून वारंवार मास्क घालण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परंतु, या व्हिडिओमध्ये निरंजन कुमार यांच्या मुलाने मास्क घातलेला नाही. त्यामुळे भाजप आमदार निरंजन कुमार यांना सोशल ट्रोल करण्यात आलं आहे. (हेही वाचा - Air India च्या कर्मचार्याला कोरोना विषाणूची लागण; दिल्ली येथील मुख्यालय केले सील)
Gundlupet BJP MLA son rides a horse on highway without wearing a mask during lockdown. Chamarajanagar district police are verifying the violation and wether to book case or not. #LockdownViolations pic.twitter.com/sIMU4HZy8e
— Nagarjun Dwarakanath (@nagarjund) May 12, 2020
याशिवाय लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आमदाराच्या मुलावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, निरंजन कुमार यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'या व्हिडीओत दिसत असलेला तरुण माझा मुलगा आहे. मात्र, तो घोडेस्वारी करु शकत नाही असा कोणताही नियम नाही. मी काल बंगळुरुत होतो. नुकतंच म्हैसूर येथे आलो आहे. काय झालंय याची मला नेमकी माहिती नाही. मात्र, यासंदर्भात मी याची माहिती घेईन. जर त्याची चुकी असेल तर मी त्याला काय चुकीचं आहे आणि काय योग्य हे समजावून सांगेन. मी त्याची बाजू घेणार नाही, असं म्हटलंय.