Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

Jammu & Kashmir: काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. शनिवारी पहाटे गोळीबार झाला ज्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. कश्मीर पोलीसांनी अशी माहिती ट्विटरवरुन दिली आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात सुरक्षा दलांनी शुक्रवारी शोध मोहीम सुरू केली. काश्मीर झोन पोलिसांनी याआधी ट्विट केले होते की, तेथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर शोध घेण्यात आला. या संदर्भात पुढील चौकशी चालू केली आहे.