Bisleri, Jayanti Chauhan (PC - Wikipedia/Twitter)

Bisleri New CEO: बिस्लेरी इंटरनॅशनलचे (Bisleri International) चेअरमन रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांची मुलगी जयंती चौहान (Jayanthi Chauhan) आता मिनरल वॉटर कंपनीची प्रमुख असेल. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited TCPL) सोबत अधिग्रहणाची चर्चा संपल्यानंतर कंपनीने जयंतीकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनी चालवेल. आता आम्हाला आमचा व्यवसाय विकायचा नाही.

टाटा कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड (TCPL) सोबतचा करार रद्द केल्यानंतर, जयंती चौहान आता बिसलरीची जबाबदारी स्वीकारणार आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, आता जयंती चौहान बिसलरीच्या प्रमुख असतील. टाटासोबतचा करार रद्द झाल्यानंतरच कंपनीने जयंती यांना प्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या जयंती चौहान या कंपनीच्या व्हाईस चेअरपर्सन म्हणून कार्यरत आहेत. (हेही वाचा -Rupee To Replace Dollar In 18 Countries: जागतिक बाजारात रुपया ठरणार डॉलरला पर्याय, 18 देशांची मान्यता; पाहा यादी)

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, जयंती आता अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन टीमसोबत काम करेल. जयंती वेळोवेळी मिनरल वॉटरच्या व्यवसायाशी संबंधित आहे. बिस्लेरीच्या पोर्टफोलिओचा एक भाग असलेला वेदिका ब्रँड हा अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्याचे मुख्य लक्ष आहे.

दरम्यान, 82 वर्षीय रमेश चौहान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला टाटा समूहाला बिस्लेरी 7,000 कोटी रुपयांना विकण्याचा करार केला होता. तथापि, 18 मार्च रोजी हा करार रद्द झाला. तथापी, जयंती चौहान यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात गेले आहे. हायस्कूलनंतर, तिने लॉस एंजेलिसमधील FIDM (फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंग) येथे उत्पादन विकासाचा अभ्यास केला. जयंतीने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. जयंतीने अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणूनही काम केले आहे. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मधून त्यांनी अरबी भाषा शिकली.

जयंतीने वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या वडिलांसोबत बिसलरीच्या दिल्ली कार्यालयात काम सुरू केलं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जयंतीने बिस्लेरीच्या प्लांटचे नूतनीकरण आणि प्रक्रिया ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी कंपनीच्या मानव संसाधन विभागात (HR) तसेच विक्री आणि विपणन संघात महत्त्वपूर्ण बदल केले. 2011 मध्ये जयंती दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाली. हिमालयाचे वेदिका नॅचरल मिनरल वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक्स आणि बिसलेरी हँड प्युरिफायर्स आदी बिस्लेरीचे नवीन ब्रँड चालवण्यात जयंतीचा मोलाचा वाटा आहे.