Jammu and Kashmir: पुलवामा जिल्ह्यात चकमक;  सुरक्षा दलाच्या जवानांंकडून 2 दहशतवाद्याला कंठ्स्नान
भारतीय जवान (Photo Credits: PTI)

आज सकाळी, पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील अवंतीपोरा (Awantipora) इथे पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा जवान (Security Forces) आणि दहशतवादी (Terrorist) यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांंना कंठस्थान घालण्यात यश आले आहे. आज रात्री 2.10 च्या सुमारास 130 बटालियन सीआरपीएफ, 55 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG)आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यानंतर झालेल्या तपासणीमध्ये या दहशतवाद्यांंचे मृतदेह आढळून आला. अद्याप यातील एका दहशतवाद्याची ओळख पटू शकली नाही.

पुलवामा जिल्ह्यातील पंझगम (Panzgam) येथे काही दहशतवादी लपून बसले आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर देताना सुरु झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. यातील एका आतंकवाद्याचे नाव शौकत अहमद असल्याचे उघडकीस आले आहे, जो गेल्या चार वर्षांपासून पुलवामा क्षेत्रात सक्रिय होता.

दरम्यान, गुरुवारीदेखील पुलवामा जिल्ह्यामध्येच दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली होती. त्यामध्ये 3 दहशतवादी ठार झाले, तर एक जवान शहीद झाला होता. चकमकीत मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील काही भागांमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. संभाव्य धोका ओळखून परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.