Isudan Gadhvi (PC - Facebook)

Gujarat Assembly Election: आम आदमी पार्टी (AAP) ने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला आहे. पक्षाने पत्रकार इसुदान गढवी (Isudan Gadhvi) यांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. इसुदान गढवी हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत.

विशेष म्हणजे केजरीवाल यांनी गुजरातमध्ये पक्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करताना केजरीवाल म्हणाले, “आम्हाला 16 लाख 48 हजारांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. यापैकी सुमारे 73 टक्के लोकांनी इसुदान गढवी यांचे नाव सुचवले आहे." (हेही वाचा - Madhya Pradesh High Court: पत्नी पतीशिवाय इतर व्यक्तीसोबत फिरत असेल तर तो व्यभिचार मानला जाणार नाही; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी)

जनतेचे मत जाणून घेण्यासाठी पक्षाने फोन नंबर आणि ईमेल आयडी जारी केला होता. मुख्यमंत्री उमेदवाराबाबत राज्यातील जनतेकडून व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉईस मेसेज किंवा 6357000360 या क्रमांकावर संदेशाद्वारे मते मागविण्यात आली होती. आमचा पक्ष इतर पक्षांसारखा नाही, असे केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले होते. आम्ही जनतेला विचारतो की, तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवं आहे. आम्ही गुजरातच्या जनतेला विचारत आहोत की, गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाच्या बाजूने उभा असलेला कोणता उमेदवार राज्याचा मुख्यमंत्री होणार हे तुम्ही सांगा.

दरम्यान, गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. हिमाचल प्रदेशसह विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.