
ISRO RECRUITMENT 2024: इस्रोमध्ये भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तंत्रज्ञ सहायक ते अभियंता या पदांसाठी ही भरती होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इस्रोमध्ये वैद्यकीय अधिकारी, वैज्ञानिक अभियंता यासह विविध पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १९ तारखेपासून अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवार www.isro.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या अर्जाची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे. हे देखील वाचा: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Microsoft ने पुणे येथील हिंजवडीत खरेदी केली 1 हजार कोटीची जमीन
इस्रोची ही भरती मानवी अंतराळ उड्डाण केंद्रासाठी केली जात आहे. ज्यांना इस्रोचा अनुभव घ्यायचा आहे ते यासाठी अर्ज करू शकतात. वैद्यकीय अधिकारी SD, वैद्यकीय अधिकारी SC, वैज्ञानिक, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ बी, ड्राफ्ट्समन बी, सहाय्यक या पदांसाठी भरती सुरू झाली आहे. 103 पदांसाठी भरती सुरू होणार आहे.
ISRO भरतीसाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वीपास/ITI/M.E/M.Tech/MBBS/MD पदवी असणे आवश्यक आहे.यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी पदानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 28 ते 35 वर्षे या वयोगटातील लोक या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.