भ्रष्टाचाराशी संबंधित आयएनएक्स मीडिया प्रकरणात (INX media case) माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांची जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi HighCourt) सोमवारी फेटाळून लावली आहे. सध्या कॉंग्रेसचे ( Congress) जेष्ठ नेते चिदंबरम तिहार तुरूंगात (Tihar Jail) आहेत. 19 सप्टेंबर रोजी विशेष कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडी दुसऱ्यांदा 14 दिवसांसाठी वाढविली होती. चिदंबरम यांना 3 ऑक्टोबरपर्यंत तिहार तरुंगात ठेवण्यात येणार आहे.
सुनावणीदरम्यान हायकोर्टाने म्हटले आहे की, आतापर्यंत या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड झाली नाही, परंतु जामीन मिळाल्यास चिदंबरम साक्षीदारांवर प्रभाव पाडू शकतात. यामुळे त्यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने 20 ऑगस्ट रोजी जामीन याचिका फेटाळल्यानंतर चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली होती. हे देखील वाचा-Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेसची साडेसाती संपेना; केज मतदारसंघातील उमेदवार नमिता मुंदडा यांचा भाजपात प्रवेश
ANI चे ट्विट-
INX media case: Delhi High Court rejects the regular bail petition of Congress leader P Chidambaram in CBI case. He is currently lodged in Tihar jail under CBI judicial custody. pic.twitter.com/I3YoFWqrLX
— ANI (@ANI) September 30, 2019
आयएनएक्स मीडिया समूहाला 2007 मध्ये 305 कोटी रुपये विदेशी धन प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाच्या मंजुरीत अनियमितता आढळून आली होती. याचदरम्यान पी चिदंबरम अर्थ मंत्री होते.